बाबा रामदेव यांना १००० एकर जमीन ?
By Admin | Updated: June 22, 2016 02:45 IST2016-06-22T02:45:01+5:302016-06-22T02:45:01+5:30
योगगुरू रामदेव बाबा फरिदाबादमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची लवकरच घोषणा करू शकतात.

बाबा रामदेव यांना १००० एकर जमीन ?
फरिदाबाद : योगगुरू रामदेव बाबा फरिदाबादमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची लवकरच घोषणा करू शकतात. त्यांच्या पतंजली ग्रुपला जिल्ह्यात अरावलीजवळील कोट या गावात एक हजार एकर जमीन मिळाल्याची चर्चा असून, तेथे विशाल योगा इन्स्टिीट्यूट किंवा आंतरराष्ट्रीय आरोग्य केंद्र उभारले जाऊ शकते.
घाई कशासाठी ? याबाबतच्या घोषणेसाठी थोडी प्रतीक्षा करा, असे सांगून रामदेवबाबा यांच्या प्रवक्त्याने या मुद्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)