शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:52 IST

बाबा रामदेव यांनी शनिवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात एएनआयसोबत बोलताना यासंदर्भात भाष्य केले.

अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात सध्या संपूर्ण देशभरात विविध प्रकारचे तर्क लावले जात आहेत. यातच आता, हे विमान का आणि कसे कोसळले? यासंदर्भातही तपास सुरू करण्यात आला आहे. योग गुरू बाबा रामदेव यांनी कटकारस्थानाची शक्यताही वर्तवली असून, दुश्मनी काढण्यासाठी तुर्कीमध्ये तर हे कट कारस्थान रचले गेले नाही ना? या दिशेनेही तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नुकतेच भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत-तुर्की संबंध बिघडले आहेत. तुर्की सध्या पाकिस्तानचा खास मित्र बनला आहे.

बाबा रामदेव यांनी शनिवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात एएनआयसोबत बोलताना यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, "मला अशी माहिती मिळाली आहे की, तुर्कीची एक एजन्सी मेंटनेन्सचे काम करते. एव्हिएशन सेक्टरवर भारताला आणखी काटेकोरपणे लक्ष द्यावे लागेल. या माध्यमाने तुर्कीने दुश्मनी तर काढली नसेल? कारण तेथील एजन्सी सर्व्हिस मेंटन्सचे काम करते. तिने तर कट रचला नसेल?' या दृष्टीनेही या अपघाताचा विचार व्हायला हवा.

त्या एजन्सीचा काँट्रॅक्ट दोन महिन्यांपूर्वीच संपवण्यात आला होता, असे बोलले असता, बाबा रामदेव म्हणाले, यामुळेच भारताने अशा संवेदनशील गोष्टीत परदेशी लोकांचा हस्तक्षेप 100 टक्के संपुष्टात आणायला हवा. जवळपास 265 जणांचा जीव घेणाऱ्या या विमान अपघाताचा तपास, विमान अपघात तपास ब्युरो, डीजीसीए, अहमदाबाद गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांसह इतर एजन्सी तपास करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मेघाणीनगर येथील अपघातस्थळाला भेट दिली होती.

ही दुर्घटना, एअर इंडियाचे लंडनला निघालेले AI-171 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही काही सेकंदांतच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक बसलेले होते. यांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रमेश विश्वशकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. तो आपत्कालीन दरवाजाजवळील सीट क्रमांक ११A वर बसला होता आणि वेळ असतानाच विमानातून उडी मारण्यात यशस्वी झाला.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPlane Crashविमान दुर्घटना