शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Baba Ramdev: आमचे पैसे कुठेयत, पेट्रोल ३० रुपयांना कधी मिळणार?; बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:43 IST

Baba Ramdev: सन २०२१ मध्ये केलेल्या एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

ठळक मुद्देसन २०१२ मधील बाबा रामदेव यांचे ट्विट व्हायरलनेटकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार

नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील वाद शमताना दिसत नाहीये. अॅलोपॅथी उपचार पद्धतींवर बाबा रामदेव यांनी केलेल्या गंभीर टीकेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. आता तर सन २०१२ मध्ये केलेल्या एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बाबा रामदेव यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून, आमचे पैसे कुठे आहेत, अशी विचारणा आता नेटिझन्सकडून केली जात आहे. (baba ramdev black money tweet gone viral and users asked where is our money) 

बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर केलेल्या आरोपानंतर आता बाबा रामदेव यांच्यावर विविध स्तरांतून टीका केली जात आहे. तसेच सन २०१२ मधील एक ट्विट व्हायरल झाले असून, ट्विटर युझर्स त्यावर अनेक प्रश्न विचारत आहेत. ‘काळा पैसा देशात परत आला, तर पेट्रोल ३० रुपयांना मिळेल’, असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज

३० रुपयांचे पेट्रोल १०० रुपये झाले आहे

बाबा रामदेव यांच्या ट्विटवर हंसराज मीणा यांनी प्रतिक्रिया देत, कुठे आहे काळा पैसा, तर अभिनव शर्मा म्हणतात की, ३० रुपयांचे पेट्रोल १०० रुपये झाले आहे, आणखी किती काळा पैसा आणणार आहात? तर, दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे की, पतंजली सरसों तेल आता १५५ रुपये झाले आहे आणि काळा पैसा नकोय. दुसरीकडे मनिष तिवारी म्हणतात की, ना काळा पैसा देशात परत येणार, ना पेट्रोल ३० रुपयांना मिळणार.

बाबा रामदेव यांना चर्चेसाठी आव्हान

योगगुरू बाबा रामदेव यांनी कोणत्या अॅलोपॅथी रुग्णालयामध्ये पतंजलींचे औषध उपचारांसाठी दिले आहे, अशी विचारणा करत सार्वजनिक चर्चेसाठी बाबा रामदेव यांनी पॅनलसमोर उपस्थित व्हावे, असे आव्हान ‘IMA उत्तराखंड’ यांनी दिले आहे. एका कार्यक्रमावेळी बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासाठी अॅलोपॅथी रुग्णालयात पतंजलीची औषधे वापरली जात असल्याचा दावा केला होता. यानंतर ‘IMA उत्तराखंड’ ने कोरोनाच्या उपचारासाठी कोणत्या रुग्णालयाला पतंजलीचे औषध दिले, असा प्रतिप्रश्न केला आहे.   

“सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”

दरम्यान, आमची कुठल्याही पॅथीसोबत कॉम्पिटिशन नाही, विरोध नाही. आकस्मिक स्थितीत अॅलोपॅथी उपचार आवश्यक असल्याचेही आपण मानतो, मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणासाधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि अॅडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे 98 गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते. आणि एक हजाराहून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीTwitterट्विटर