शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: अॅलोपॅथीविरोधातील वक्तव्याने बाबा रामदेव अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:33 IST

SC notice to Baba Ramdev: सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना यांच्यासमोर सुनावणी झाली असून, कोर्टाने बाबा रामदेव यांना 4 आठवड्यात उत्तर मागितले आहे.

Baba Ramdev: सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथिक औषधे आणि लसीकरणाविरोधात केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागितले आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना (CJI NV Ramana) IMA च्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान म्हणाले, 'बाबा रामदेव यांना काय झाले आहे? योग लोकप्रिय केल्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु त्यांनी उपचारांच्या इतर पद्धतींवर शंका घेऊ नये. त्यांनी इतर वैद्यकीय उपचार पद्धतींवर प्रश्न उपस्थित करू नयेत. तुमच्या उपचार पद्धतीने आजार बरे होतील, याची गॅरंटी तुम्ही घेत आहात का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला.

आता सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना नोटीस बजावली असून 4 आठवड्यात उत्तर मागितले आहे. रमन्ना यांच्या अध्यक्षेखाली न्यायमूर्ती हिमा कोहली आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालय, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि रामदेव यांच्या कंपनीला नोटीस बजावली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे की, बाबा रामदेव सतत अॅलोपॅथी औषधांच्या विरोधात अपप्रचार करत आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयानेही रामदेव यांना फटकारले

यापूर्वीही दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारले होते. त्यांनी अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते. रामदेव म्हणाले होते की, लस मिळाल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली, हे वैद्यकीय शास्त्राचे अपयश आहे. यावर कोर्टाने म्हटले की, तुमच्या वक्तव्याचा इतर देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय