शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बाबा बालकनाथ यांचा लोकसभा खासदारकीचा राजीनामा; राजस्थानचे होणार मुख्यमंत्री? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:32 IST

बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली : बाबा बालकनाथ यांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गुरुवारी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बालकनाथ यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बालकनाथ राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून खासदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तिजारा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही आपले केंद्रीय मंत्री आणि खासदार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांसह १२ खासदारांना उमेदवारी दिली होती. यापैकी गणेश सिंह आणि फग्गनसिंग कुलस्ते वगळता १० खासदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदारांनी राजीनामा दिला आहे. काल म्हणजेच बुधवारी १० खासदार आणि मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.

या खासदारांनी दिला राजीनामाआपल्या खासदारकीचा राजीमाना देणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, रिती पाठक, उदय प्रताप सिंग, नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश आहे. तर राजस्थानमधील किरोडीमल मीना, दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि छत्तीसगडमधील गोमती साई व अरुण साव या खासदारांनी राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंसमध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस आहे. दिया कुमारी यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यातच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचेही नाव चर्चेत येत आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानLokmatलोकमतElectionनिवडणूक