शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

खासदार मनोज तिवारी ड्रायव्हर, मंत्री गिरीराज गाडीत, तरी बागेश्वर बाबांच्या गाडीचे चलन पोलिसांनी फाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:30 IST

तक्रारीनंतर पाटणा वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.

बागेश्वरचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्या वाहनातून पाटणा विमानतळावरून हॉटेलपर्यंत आले होते, त्या वाहनाला दंड ठोठावण्यात आला आहे. बागेश्वर बाबा यांच्यासोबत भाजपाचे खासदार गिरिराज सिंह आणि मनोज तिवारीही होते. बागेश्वर बाबा यांची गाडी मनोज तिवारी चालवत होते. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह मागच्या सीटवर बसले होते. 

पाटणा विमानतळावरून हॉटेलमध्ये जाताना तिघांपैकी कोणीही सीट बेल्ट घातला नसल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे आली होती. तक्रारीनंतर पाटणा वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात तक्रारीची पुष्टी झाली. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत दंड ठोठावला. वाहतूक विभागाचे एसपी पुरण झा यांनी दंड ठोठावल्याचा कारवाईला दुजोरा दिला आहे, मात्र नेमकी किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाटणाचे वाहतूक विभागाचे एसपी पूरण झा यांनी सांगितले की, बागेश्वर बाबा ज्या दिवशी पाटण्याला आले होते. त्यादिवशी विमानतळावरून हॉटेलसाठी निघताना कारमध्ये बसलेल्यांपैकी कोणीही सीट बेल्ट घातला नव्हता, अशी तक्रार प्राप्त झाली. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर कारमध्ये बसलेल्या लोकांनी बेल्ट घातले होते की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले. त्यामध्ये कोणीही सीट बेल्ट घातला नसल्याचे आढळून आले. त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इंद्र विक्रम सिंह यांची गाडी-

समोर बसलेले बाबा धीरेंद्र शास्त्री, गाडी चालवणारे खासदार मनोज तिवारी आणि मागे बसलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची तक्रार पाटणा वाहतूक पोलिसांना मिळाली. MP 16C 5005 हे वाहन छतरपूर मध्य प्रदेशमध्ये नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते. ऑनलाइन नोंदीनुसार, २५ एप्रिल २०१५ रोजी इंद्र विक्रम सिंग बुंदेला यांच्या नावाने नोंदणीकृत या आलिशान कारचे नियंत्रित प्रदूषण प्रमाणपत्र २८ सप्टेंबर २०२० रोजी संपले असल्याचे सांगण्यात आले. त्यावर देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामtraffic policeवाहतूक पोलीस