रामदेव बाबांनी नाकारला कॅबिनेट दर्जा
By Admin | Updated: April 22, 2015 02:42 IST2015-04-22T02:42:23+5:302015-04-22T02:42:23+5:30
हरियाणा सरकारने योगगुरू रामदेवबाबा यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला; पण रामदेवबाबा यांनी तो नाकारला

रामदेव बाबांनी नाकारला कॅबिनेट दर्जा
सोनीपत : हरियाणा सरकारने योगगुरू रामदेवबाबा यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला; पण रामदेवबाबा यांनी तो नाकारला असून मी बाबाच बरा असे म्हटले आहे. मला मंत्रिपदाची आकांक्षा नाही, मी बाबा आहे आणि बाबाच बरा, असे रामदेवबाबा म्हणाले.
दिल्लीपासून ६० कि. मी. अंतरावर एका वनराईत रामदेवबाबा यांना सन्मानित करण्यासाठी हरियाणा सरकारने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना रामदेवबाबा यांनी ही घोषणा
केली.
या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल मी हरियाणा सरकारचे मनापासून आभार मानतो; पण मला नम्रतेने असे सांगायचे आहे की, एक बाबा-फकीर या स्वरूपात मला सेवा करायची आहे. आपण जे काही मला दिलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे; पण हा सन्मान मी आपल्याला परत करू इच्छितो. सध्या मी योग व आयुर्वेद यांच्या प्रसारासाठी राज्याचा ब्रँड अँबेसेडर होईन.
विरोधी पक्ष काँग्रेसने रामदेवबाबांना असे अँबेसेडरपद वा मंत्रिपद देण्यास विरोध केला होता. (वृत्तसंस्था)