अझरचं तिस-यांदा शुभमंगल ?

By Admin | Updated: December 20, 2015 16:06 IST2015-12-20T16:06:46+5:302015-12-20T16:06:46+5:30

भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन शेनन मेरी या आपल्या मैत्रीणीबरोबर विवाहबध्द झाल्याची चर्चा आहे.

Azhar is for the third time Shubhamangal? | अझरचं तिस-यांदा शुभमंगल ?

अझरचं तिस-यांदा शुभमंगल ?

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन शेनन मेरी या आपल्या मैत्रीणीबरोबर विवाहबध्द झाल्याची चर्चा आहे. शेनन ही अझरुद्दीनची तिसरी पत्नी आहे. पॅरिसभ्रमंतीवरील दोघांचे फोटो लीक झाल्यानंतर २०१३ मध्ये सर्वप्रथम या दोघांची मैत्री समोर आली होती. 

अझरच्या गाडीचा वाहन चालक जान मोहम्मदचं सप्टेंबरमध्ये एका अपघातत निधन झाले. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अझर शनिवारी शामली इथे गेला होता. त्यावेळी अझरचे हे नवीन नाते उघड झाले. अझरसोबत शेननही जान मोहम्मदच्या घरी गेली होती. त्यावेळी अझरने शेननची ओळख पत्नी म्हणून करुन दिल्याचे तिथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. शेनन मूळची अमेरिकन असून सध्या ती दिल्लीमध्ये वास्तव्याला आहे. 
क्रिकेटच्या मैदानावर असताना अझरचे अभिनेत्री संगीत बिजलानीबरोबर सूर जुळले. त्यावेळी त्याने पहिली पत्नी नैरीनला घटस्फोट देऊन संगीता बिजलानीबरोबर दुसरा विवाह केला. मात्र काहीवर्षातच दोघांमध्ये बेबनाव झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. 
२०१० मध्ये अझरचे नाव दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी जोडले गेले. त्यानंतर शेनन बरोबर त्याची मैत्री समोर आली. क्रिकेटनंतर अझर त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत राहिला आहे 

Web Title: Azhar is for the third time Shubhamangal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.