अल कायदाच्या हिटलिस्टसाठी आझम खानची मदत - साक्षी महाराज
By Admin | Updated: November 17, 2015 13:02 IST2015-11-17T12:48:46+5:302015-11-17T13:02:10+5:30
आझम खान हल्ली जे काही बोलतात ते राष्ट्रविरोधीच असते, अल कायदाला हिटलिस्ट तयार करण्यासाठीही आझम खानच मदत करत असतील अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे.

अल कायदाच्या हिटलिस्टसाठी आझम खानची मदत - साक्षी महाराज
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आझम खान हल्ली जे काही बोलतात ते राष्ट्रविरोधीच असते, अल कायदाला हिटलिस्ट तयार करण्यासाठीही आझम खानच मदत करत असतील अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे. पाकिस्तान हे माथेफिरु राष्ट्र असून त्यांच्याकडे अण्वस्त्र नकोच असेही त्यांनी म्हटले आहे.
पॅरिस हल्ल्यासंदर्भात आझम खान यांच्या विधानावर साक्षी महाराज यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. खान म्हणाले, पॅरिसमध्ये मोठा हल्ला व तो हल्ला म्हणजे फक्त प्रतिक्रिया होती असे आझम खान म्हणतात. त्यांच्या एखाद्या दहशतवादी संघटनेची संबंध असावेत असे मला वकधी कधी वाटते. आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही त्यांनी केली. आझम खान यांनी पॅरिसवर इसिसचा हल्ला म्हणजे अमेरिका व रशियाच्या सीरिया व इराकमधील कारवाईवरील प्रतिक्रिया होती असे बेताल वक्तव्य आझम खान यांनी केले आहे.