आझम खानना पाकिस्तानात पाठवले पाहिजे - योगी आदित्यनाथ
By Admin | Updated: November 5, 2014 14:53 IST2014-11-05T14:47:00+5:302014-11-05T14:53:13+5:30
आझम खान यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

आझम खानना पाकिस्तानात पाठवले पाहिजे - योगी आदित्यनाथ
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ५ - 'आझम खान यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे' असे वक्तव्य करत भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणा-या सपा नेते आझम खान यांना आदित्यनाथ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी ईदनिमित्त मुसलमानांना शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यावरूनच त्यांचे मन किती छोटे आहे हे कळते, अशी टीका आझम खान यांनी केली होती.
समाजवादी पक्षाचे नेते असलेले आझम खान म्हणजे कावळा असून ते ज्या झाडावर बसतील ते झाड वाळून जाते. त्यांना पाकिस्तानात पाठवून दिले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले.
यापूर्वीही आदित्यनाथ यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. जामा मशिदीच्या शाही इमामपदाच्या दस्तारबंदी समारोहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न बोलावता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देणा-या इमाम सय्यद अहमद बुखार यांच्यावरही आदित्यनाथ यांनी टीका केली होती. बुखारी यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे, असे टीकास्त्र आदित्यनाथ यांनी साडले होते.
यापूर्वी अनेकवेळा आझम खान व योगी आदित्यनाथ यांच्यादरम्यानही शाब्दिक चकमक उडाली होती.