आझम खान पाकिस्तानी- साक्षी महाराजांचे टीकास्त्र

By Admin | Updated: October 6, 2015 11:27 IST2015-10-06T11:26:55+5:302015-10-06T11:27:29+5:30

आझम खान हे पाकिस्तानी असून त्यांचा पाकिस्तानमधील राजकीय प्रभाववावर विश्वास आहे, अशी टीका भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे.

Azam Khan Pakistani-Sakshi Maharaj's Vocabulary | आझम खान पाकिस्तानी- साक्षी महाराजांचे टीकास्त्र

आझम खान पाकिस्तानी- साक्षी महाराजांचे टीकास्त्र

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - आझम खान हे पाकिस्तानी असून त्यांचा पाकिस्तानमधील राजकीय प्रभाववावर विश्वास आहे, अशी टीका भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन झालेल्या हत्येमागे भाजपाचाच हात आहे, असा आरोप करत याप्रकरणी संयुक्त राष्ट्राने लक्ष घालावी अशी विनंती आझम खान यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत साक्षी महाराजांनी त्यांच्यावरच टीकास्त्र सोडले.
' आम्हाला जशी आमची आई आहे, तशीच भारतमाता व गायमाता आहे.  दादरी प्रकरणाचे राजकारण करण्यात येत असून ते निषेधार्ह आहे. आझम खान पाकिस्तानी असून त्यांच्यावर तेथील राजकारणाचा प्रभाव आहे' अशी टीका त्यांनी केली. तसेच ' उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत अनेकांवर अत्याचार झाले, त्यांना हिंसेला सामोरे जावे लागले, त्या कोणालाच कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही, मग अशा प्रकारची दुटप्पी भूमिका का? असा सवालही साक्षी महाराज यांनी विचारला आहे.  
घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर दादरी येथे जमावाने मोहम्मद इखलाख या इसमाच्या घरावर हल्ला चढवला. संतप्त जमावाने घरातील लोकांना दगडविटांनी मारहाणही केली. या घटनेत इखलाखचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. 
 

Web Title: Azam Khan Pakistani-Sakshi Maharaj's Vocabulary