आझम खान यांनी मोदींची तुलना केली रावणाशी

By Admin | Updated: February 6, 2017 11:42 IST2017-02-06T11:42:25+5:302017-02-06T11:42:25+5:30

समाजवादी पक्षाचे नेता आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पंतप्रधान मोदींची तुलना रावणासोबत केली

Azam Khan compares Modi with Ravana | आझम खान यांनी मोदींची तुलना केली रावणाशी

आझम खान यांनी मोदींची तुलना केली रावणाशी

>ऑनलाइन लोकमत
रामपूर, दि. 6 - समाजवादी पक्षाचे नेता आणि उत्तर प्रदेशचे  कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी मोदींची तुलना रावणासोबत केली आहे. 
 
"दिल्लीतील एक व्यक्ती रावण दहनासाठी लखनऊला जातो मात्र, तो हे विसरतो की खरा रावण तर दिल्लीतच बसला आहे" असं मोदींचं नाव न घेता ते म्हणाले. 
 
"131 कोटी भारतीयांवर राज्य करणारा राजा रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यासाठी लखनऊला गेला, मात्र खरा रावण लखनऊत नाही तर दिल्लीतच बसला आहे हे तो विसरला.  रविवारी रामपूरमध्ये एका निवडणूक रॅलीमध्ये आझम खान यांनी हे वक्तव्य केलंय. मोदी केवळ श्रीमंतांच्या फायद्यासाठीच काम करतात असं म्हणत त्यांनी समाजवादी पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं. 

Web Title: Azam Khan compares Modi with Ravana