शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आयुष्यमान भारत म्हणजे जनतेचा पैसा खासगी हातांमध्ये देण्याचा अधिकृत मार्ग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 13:03 IST

एम्सच्या कार्यक्रमात डॉक्टरांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली: आयुष्यमान योजनेच्या नियोजन आणि क्षमतेवर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी, एम्समधील डॉक्टरांची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयुष्यमान भारत योजना म्हणजे जनतेला पैसा खासगी क्षेत्राला देण्याचा अधिकृत मार्ग असल्याचा सूर नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उमटला. एम्समध्ये 'आयुष्यमान भारत: तथ्यं आणि कल्पना' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा सुधारायला हव्यात, अशी गरज यामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी व्यक्त केली. आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असल्याचं वर्णन जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या सामाजिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक डॉ. विकास बाजपेयी यांनी केलं. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसारख्या सरकारी योजना का अपयशी ठरल्या, याचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 'याआधीही सरकारकडून आरोग्य क्षेत्रासाठी योजना राबवण्यात आल्या. त्यातील त्रुटींचा अभ्यास केला असता, तर अधिक चांगलं झालं असतं. आधी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळता आली असती,' असं मत त्यांनी व्यक्त केलं.  लोकांच्या, त्यातही गरिबांच्या आजारपणाचं नेमकं कारण काय, या मुद्द्याचा आयुष्यमान भारत योजनेत विचारच करण्यात आलेला नाही, असं बाजपेयी म्हणाले. आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा खासगी क्षेत्राच्या हाती जाणारं एक माध्यम असल्याचा दावा त्यांनी केला. एम्समधील जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या सुब्रतो सिन्हा यांनीही आयुष्यमान भारतवर प्रश्न उपस्थित केले. 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारायला हवा. कोणतीही आरोग्य योजना राबवताना हाच केंद्रबिंदू असायला हवा. मात्र आयुष्यमान योजनेत याचा विचार झालेला नाही,' असं सिन्हा म्हणाले.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतAIIMS hospitalएम्स रुग्णालय