सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हि़डीओ हसवतात तर काही विचार करायला भाग पाडतात. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याने लोकांची मनं जिंकली आहेत. जर्मनीतून अयोध्येत आलेल्या एका छोट्या भक्ताने राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर भारतातील आपला अनुभव शेअर केला. ज्या पद्धतीने हे सर्व सांगितलं, त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
जर्मनीतून अयोध्येत आलेल्या लहान मुलाने रामललाचं दर्शन घेतलं. भव्य-दिव्य मंदिर पाहून तो भारावून गेला आहे. त्याची निरागसता, हात जोडून केलेली प्रार्थना आणि राम मंदिरावर दिलेली प्रतिक्रिया लोकांना खूप भावली आहे. हा व्हिडीओ भारताची संस्कृती आणि अध्यात्माबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये वाढत असलेली ओढ दाखवतो.
"माझं नाव आंजन्य आहे. मी जर्मनीहून आलो आहे. राम मंदिरातील माझा अनुभव खरोखरच खूप चांगला होता. पण येथे प्रचंड उकाडा आहे. भारत तसाच आहे, पण मी हा उन्हाळा सहन करू शकतो. राम मंदिर अतिशय सुंदर आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहणं हा एक अत्यंत सुखद अनुभव होता..." असं या चिमुकल्या रामभक्ताने म्हटलं आहे.
संपूर्ण राम मंदिर तयार झाले आहे. राम मंदिर परिसरात अनेक मंदिरं बांधण्यात आली असून, त्याचंही लोकार्पण झालं आहे. अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली. भारतासह जगभरातून कोट्यवधी भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच पुढील काही काळात प्रतिवर्षी सुमारे ५५० कोटी भाविक अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधण्यात आला आहे.
Web Summary : A young devotee from Germany, Anjeneya, visited Ayodhya's Ram Temple and shared his positive experience, noting the heat but praising the beautiful Ram Lalla statue. Millions visit yearly.
Web Summary : जर्मनी के एक युवा भक्त, आंजनेय, ने अयोध्या के राम मंदिर का दौरा किया और अपने सकारात्मक अनुभव को साझा किया, गर्मी का उल्लेख किया लेकिन सुंदर राम लल्ला की मूर्ति की प्रशंसा की। लाखों लोग प्रतिवर्ष आते हैं।