शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या : 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा, सरन्यायाधीशांची सर्व पक्षकारांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:23 IST

गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

नवी दिल्ली - गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी थांबवण्यात येणार नाही. न्यायालयातील सुनावणीबरोबरच मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच  सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावेत, अशी सूचनाही सरन्यायाधीशांनी या खटल्यातील सर्व पक्षकारांना केली.  

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दररोज एक तास अधिक सुनावणी घेण्याचा तसेच शनिवारीदेखील सुनावणी घेण्याचा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे.  आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ''राम मंदिर जन्मभूमी खटल्यातील सर्व पक्षकारांचे युक्तिवाद आणि दावे 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत. जेणेकरून निकाल लिहिण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल.'' त्यावर उत्तर देताना मुस्लिम पक्षकारांनी आपला युक्तिवाद 27 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील असे सांगितले. तर मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी आपल्यालाही उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील, असे सांगितले. ''या खटल्यात मध्यस्थीसाठी आम्हाला पत्र मिळाले आहे. आता हे प्रयत्न नियमित सुनावणीपासून स्वतंत्रपणे समांतर पातळीवर सुरू ठेवता येतील, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय