शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 17:53 IST

अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे.

ठळक मुद्देअयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाहीया प्रकरणाच्या याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती  उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच सदस्यीच घटनापीठाची स्थापना केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे अॅडिशनल रजिस्ट्रार (लिस्टिंग) यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाही. 

  दरम्यान, या प्रकरणाच्या याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती  उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती. न्या. ललित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याने 29 जानेवारीला नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. याच खटल्यामध्ये यापूर्वी वकील म्हणून काम केल्यामुळे ललित यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठावर आक्षेप नोंदवला. धवन यांनीच न्या. उदय ललित यांचाही मुद्दा उपस्थित केला. पाच न्याधीशांच्या घटनापीठामध्ये समावेश असलेले न्यायाधीश उदय ललित हे याप्रकरणी संबंधित असलेले आरोपी कल्याण सिंह यांची बाजू मांडण्यासाठी 1997 साली वकील म्हणून उपस्थित होते, असे सांगत वकील राजीव धवन यांनी आक्षेप घेतला. राजीव धवन यांच्या आक्षेपानंतर न्यायाधीश उदय ललित यांनी या घटनापीठातून माघार घेतली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतAyodhyaअयोध्या