शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 06:17 IST

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने ९ फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर जागा द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. ट्रस्टचे सदस्य व मुख्याधिकारी यांच्या नावांची घोषणा सरकारने केलेली नाही. पंतप्रधानांनी लोकसभेत सांगितले की, हा ट्रस्ट ही स्वतंत्र संस्था असेल.

करड्या रंगाचे जॅकेट व भगवा मफलर अशा वेशात पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभेत आले व त्यांनी ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येणार नाही, असे समजते. पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे खासदार, मंत्री हे राजकीय नेतेच असले तरी त्यांच्याकडे घटनात्मक पदेही आहेत.त्यामुळे ते ट्रस्टवर नसतील, असे कळते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, या ट्रस्टविषयीची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

राममंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टबद्दल घोषणा केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. शहा यांनी एम्हटले आहे की, या ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. त्यातील एक सदस्य दलित असेल. या ट्रस्टच्या ताब्यात अयोध्येतील ६७ एकर जमीन असेल. तिथे राममंदिर बांधण्यात येईल.

उत्तर प्रदेश सरकारने रामजन्मभूमीपासून २० ते २५ किमी अंतरावर मुस्लिमांना मशिदीसाठी ५ एकर जमीन देण्याचे ठरविले आहे. हिंदुत्वाद्वारे भाजप समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप फोल ठरविताना म्हणाले की, भारतातील सारे लोक विशाल कुटुंबाचे सदस्य आहेत. मग ते हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन वा अन्य कुणीही असोत.

शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार

राममंदिराच्या शिलान्यासाला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकार निमंत्रण देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रस्ट स्थापन करण्याबाबत मोदी सरकारने डिसेंबरमध्येच मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र या ट्रस्टमध्ये राजकीय नेत्यांना सदस्य म्हणून घ्यायचे की नाही याबद्दल सरकारचा निर्णय होत नव्हता. ट्रस्ट कसा असावा याची रूपरेषा केंद्र सरकारने ठरविली आहे. यापूर्वी राममंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने बिहारचे तत्कालीन आमदार कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ केला होता. चौपाल हे दलित समाजातील व विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव होते. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत