शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरच्या एका वर्षातच काँग्रेसनं वापरलं रामनामाचं कार्ड; 'असा' होता निवडणुकीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 12:49 IST

रामाच्या मुद्द्यावर लढवली गेलेली देशातील पहिली निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारानं वापरला राम मंदिराचा मुद्दा

अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न होत आहे. यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या भव्यदिव्य राममंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. अयोध्या आणि राम मंदिरावरून देशात प्रचंड राजकारण झालं. भाजपानं १९८९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. मात्र काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी झालेल्या अयोध्येतल्या पोटनिवडणुकीत रामाच्या नावावर मतं मागितली होती. इतकंच नव्हे, तर त्यांना हिंदुत्वाचं कार्डदेखील अगदी स्पष्टपणे वापरलं होतं.देशाच्या स्वातंत्र्यासाठी १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. १९३४ मध्ये काँग्रेसमध्ये राम मनोहर लोहिया आणि आचार्य नरेंद्रदेव यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांचा एक गट तयार झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच आचार्य नरेंद्रदेव यांनी त्यांच्या ७ समर्थक आमदारांसह उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मार्च १९४८ मध्ये त्यांनी सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली.आचार्य नरेंद्रदेव यांनी अयोध्येला (फैजाबाद) त्यांची राजकीय कर्मभूमी बनवलं होतं. आचार्य यांनी सोशालिस्ट पक्षाकडून फैजाबाद विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. त्यावेळी गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नरेंद्रदेव यांच्या विरोधात हिंदू संत बाबा राघव दास यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली. राघव दास स्वत:ला गांधीवादी आणि विनोबांचे शिष्य म्हणायचे. मात्र फैजाबादमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून उमेदवारी दिली.मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत फैजाबादमध्ये बाबा राघव दास यांच्या प्रचाराला आले होते. आचार्य नरेंद्र देव प्रभू रामचंद्रांना मानत नाहीत. ते नास्तिक आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची नगरी अशा व्यक्तीला कशी स्वीकारेल?, असा सवाल पंत यांनी प्रचारावेळी उपस्थित केला होता. फैजाबाद पोटनिवडणुकीत काँग्रेसनं हिंदुत्व कार्ड वापरलं. २८ जून १९४८ मध्ये मतदान झालं. त्यात राघवदास यांना ५ हजार ३९२ मतं मिळाली. तर आचार्य नरेंद्रदेव यांना ४ हजार ८० मतं मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री पंत यांची धार्मिक खेळी यशस्वी ठरली. आचार्य नरेंद्रदेव १ हजार ३१२ मतांनी पराभूत झाले. रामाच्या नावाचा वापर झालेली ही देशातली पहिली निवडणूक होती.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याcongressकाँग्रेस