शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Babri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज; जाणून घ्या, दोषी आढळल्यास कुणाला किती होईल शिक्षा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 30, 2020 10:03 IST

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.

ठळक मुद्दे6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेलीबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल आज 28 वर्षांनंतर येत आहे.बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले.

लखनौ - बाबरी मशीद Babri Masjid verdict विध्वंस प्रकरणाचा निकाल आज 28 वर्षांनंतर येत आहे. या प्रकरणात भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani), मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi), उमा भारती (Uma Bharti) यांच्यासह एकूण 32 आरोपींवर आज लखनौचे सीबीआय न्यायालय निर्णय देणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास अनेक नेत्यांना 3 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतचीही शिक्षा होऊ शकते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.

...तर आडवाणी, जोशी आणि उमा भारती यांना होईल 5 वर्षांची शिक्षा?बाबरी विध्वंस प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश एस के यादव यांनी याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना दोषी ठरवले, तर त्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

दोषी ठरल्यास कल्याण सिंह यांना किती शिक्षा होऊ शकते?न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आरएम श्रीवास्तव हे दोषी ठरवले, तर त्यांना जास्तीतजास्त 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

महंत नृत्य गोपाल आणि चंपत राय यांना किती शिक्षा होऊ शकते?बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी महंत नृत्य गोपाल दास, राम विलास वेदांती, राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय, सतीश प्रधान आणि धरम दास हे विध्वंस प्रकरणात दोषी ठवले गेले, तर त्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

यांना होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा -भाजपा खासदार बृजभूषण सिंह, माजी आमदार पवन कुमार पांडेय, जय भगवान गोयल आणि ओम प्रकाश पांडेय हे या प्रकरणात दोषी आढळल्यास, त्यांना जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

खासदार लल्लू सिंहांसह यांनाही होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा -बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी फिरोजाबाद येथील खासदार लल्लू सिंह, मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री जयभान सिंह पवैया, आचार्य धर्मेंद्र देव, रामजी गुप्ता, प्रकाश शर्मा, धर्मेंद्र सिंह गुर्जर आणि कारसेवक, रामचंद्र खत्री, सुखबीर कक्कर, अमन नाथ गोयल, संतोष दुबे, विनय कुमार राय, कमलेश त्रिपाठी, गांधी यादव, विजय बहादुर सिंह, नवीन भाई शुक्ला यांना जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीUma Bhartiउमा भारतीRam Mandirराम मंदिरCourtन्यायालय