शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:51 IST

संशोधकांनी म्हटले आहे की, वनशेतीची जागा भातशेती घेत आहे. भातशेतीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून मोठी झाडे तोडली

नवी दिल्ली : इ.स. २०१८ ते २०२२ या काळात भारतातील शेतजमिनीवरील ५० लाख झाडे नष्ट झाली आहेत, असे ‘नेचर सस्टेनॅबिलिटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे. बदललेल्या शेती पद्धतीमुळे या झाडांवर कुऱ्हाड कोसळल्याचे अहवालात नमूद केले आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की, वनशेतीची जागा भातशेती घेत आहे. भातशेतीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून मोठी झाडे तोडली. झाडे आता केवळ ठराविक क्षेत्रातच (ब्लॉक प्लँटेशन) वाढवली जात आहेत. अशा झाडांचे पर्यावरणीय मूल्य अत्यल्प आहे. ब्लॉक प्लँटेशनमध्ये झाडांच्या मोजक्याच जाती जोपासल्या जातात. तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यांतील शेतकऱ्यांनी मुलाखतीत ही माहिती दिली.

सावलीमुळे फटका- डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, कमी आर्थिक लाभ असलेली आणि सावलीमुळे पिकांना अपाय करणारी लिंबासारखी झाडे नव्या पद्धतीत जमिनीवरून काढली जात आहेत. - त्यामुळे भात लागवडीखालील क्षेत्र वाढले तसेच उत्पादनातही वाढ झाली. नवीन बोअरवेलमुळे पाण्याची सुविधा वाढली. वास्तविक या झाडांचे सामाजिक-पर्यावरणीय लाभ आहेत. ही झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषणाचे मोठे काम करतात.

टॅग्स :FarmerशेतकरीCropपीक