अजब ! अंतर्वस्त्र चोरी होत असल्याने महिला हैराण

By Admin | Updated: June 22, 2017 16:41 IST2017-06-22T16:40:27+5:302017-06-22T16:41:55+5:30

महिलांची अंतर्वस्त्र चोरीची ही घटना ऐकून पोलीसदेखील आश्चर्यचकित झाले आहेत

Awesome! Since the underwear is being stolen, women are being arrested | अजब ! अंतर्वस्त्र चोरी होत असल्याने महिला हैराण

अजब ! अंतर्वस्त्र चोरी होत असल्याने महिला हैराण

>ऑनलाइन लोकमत
चंदोली, दि. 22 - आजपर्यंत तुम्ही महागड्या, अनोख्या वस्तूंची चोरी झाली असल्याचं ऐकलं असेल....पण उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यात एका वेगळ्याच चोरीची घटना समोर आली आहे. ही चोरी कोणत्याही दाग दागिने, पैशांची नसून अंतर्वस्त्रांची आहे. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर प्रभुपूर गावातील हा चोरीचा प्रकार समोर आला. महिलांची अंतर्वस्त्र चोरीची ही घटना ऐकून पोलीसदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.

(VIDEO : महिलांचे अंतर्वस्त्र चोरणारा सीसीटीव्हीत कैद)
(अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी पाठवला मेमो)
 
चंदोली येथील बलुआ ठाण्यात कार्यरत असलेल्या एएसआय बब्बन सिंह यांनी सांगितलं की, महिलांनी अर्ज देऊन या चोरीची तक्रार केली आहे. अंतर्वस्त्र बाहेर ऊनात सुकायला टाकल्यानंतर त्यांची चोरी होत असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. लोकांमध्ये हसू होईल म्हणून महिलांनी ही गोष्ट समोर आणली नव्हती. पण जेव्हा प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं तेव्हा मात्र त्यांनी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीला प्रकरणाची माहिती दिली. 
 
त्या व्यक्तीने 100 नंबर डायल करत महिलांचे अंतर्वस्त्र चोरी होत असल्याची माहिती दिली. महिलांनी दिलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, गावातील महिला, तरुणी आंघोळीनंतर अंतर्वस्त्र अंगणात किंवा छतावर सुकवण्यासाठी टाकतात तेव्हा त्यांची चोरी होते. नंतर हे सर्व कपडे नाल्यात पडलेले सापडतात. 
 
महिलांचा गावातील एका अल्पवयीन तरुणावर संशय आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर ज्या तरुणावर महिलांनी संशय व्यक्त केला आहे तो फरार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुरु असून, यामुळे महिला हैराण झाल्या आहेत. तरुणींमध्ये तर भीतीचे वातावरण तयार झालं असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Awesome! Since the underwear is being stolen, women are being arrested