शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात अवतरणार तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आवाजी’ बँकिंगचे युग!

By admin | Updated: April 7, 2015 04:00 IST

खातेदाराची त्याच्या आवाजावरून ओळख पटवून त्याआधारे त्याला फोनवरून तोंडी सूचना देऊन बँकेचे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणारे

मुंबई: खातेदाराची त्याच्या आवाजावरून ओळख पटवून त्याआधारे त्याला फोनवरून तोंडी सूचना देऊन बँकेचे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आयसीआयसीआय बँक येत्या काही आठवड्यांत कार्यान्वित करणार आहे. खातेदाराची ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने ओळख पटविण्यासाठी ‘व्हॉईस रेकग्निशन टेक्नॉलॉजी’ वापरणारी आयसीआयसीआय ही देशातील पहिली व जगातील मोजक्या बँकांमधील बँक ठरणार आहे.सध्या नेट बँकिंग किंवा फोन बँकिंगने व्यवहार करताना खातेदाराला आपली ओळख पटविण्यासाठी १६ आकडी खातेक्रमांक किंवा पिन नंबर घालावा लागतो. म्हणजे त्याला ही माहिती संगणक किंवा मोबाईलची बटणे दाबून एंटर करावी लागते. हे तंत्रज्ञान खातेदाराचा केवळ आवाजच ओळखू शकते असे नव्हे, तर त्या बोलणारा रागावलेला आहे, चिडलेला आहे, की घाईत आहे यातील फरकही करू शकत असल्याने त्यानुसार खातेदारास सेवा देणेही शक्य होऊ शकेल. येत्या काही आठवड्यांत खातेदाराने आयसीआयसीआय बँकेस फोन केल्यावर १० सेकंदात बँकेचे सर्व्हर त्याच्या खात्याचा तपशील शोधून काढू शकतील आणि बँकेच्या डेटाबेससोबत त्या आवाजाच्या नमुन्याची ताडणी करून खातेदाराची ओळख पटविली जाईल.अ‍ॅपलचे ‘सिरी’ (र्र१्र) हे आवाज ओळखणारे सॉफ्टवेअर ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. तेच तंत्रज्ञान खातेदाराच्या ‘व्हॉईस रेकग्निशन’साठी वापरणार आहे. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानासाठी बोलणाऱ्याने ठराविक भाषेतच बोलण्याची किंवा ठराविक शब्दच उच्चारण्याची गरज नसल्याने ओळख पटविण्याचे काम सुलभपणे होईल. परिणामी सामान्यातील सामान्य व्यक्तीही बँकेचे व्यवहार करू शकेल.ओळख पटविण्यासाठी बोटांचे ठसे किंवा डोळ्याच्या बाहुल्यांची छबी अशा बायोमेट्रिकच्या अन्य पद्धतींचा अवलंब करण्याचे ठरविले असते तर त्यासाठी स्कॅनरही बसवावे लागले असते; परंतु ‘व्हॉईस रेकग्निशन’साठी कोणत्याही फोनवरून बँकेच्या कॉल सेंटरला केलेला फोन पुरेसा आहे. खातेदारांच्या आवाजाचे नमुने व सर्व्हर हे दोन्ही कॉल सेंटरमध्येच असणार असल्याने ‘डेटा कनेक्टिव्हिटी’चीही अडचण येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)