अर्थसंकल्पाला आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

By Admin | Updated: July 7, 2015 01:05 IST2015-07-07T01:05:53+5:302015-07-07T01:05:53+5:30

मनपा आर्थिक संकटात : घोषणांचा पाऊ स कागदावरच

Awaiting the approval of Commissioner for the budget | अर्थसंकल्पाला आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

अर्थसंकल्पाला आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

पा आर्थिक संकटात : घोषणांचा पाऊ स कागदावरच
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सन २०१५-१६ या वर्षाचा तब्बल १९६४.९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर क रून सर्वांना आश्चर्याचा धक्न्का दिला. सभागृहात बहुमत असल्याने अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. परंतु मनपाची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अद्याप अर्थसंकल्पाला मंजुरी दिलेली नाही.
आर्थिक तंगीमुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. विकास योजना ठप्प पडल्या आहेत. त्यातच आयुक्तांनी अर्थसंकल्पावर स्वाक्षरी केल्याशिवाय विकास कामासाठी निधी उपलब्ध होणार नसल्याने प्रतिनिधींच्या घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे.
तिजोरीत पैसा नसल्याने आयुक्तांनी कंत्राटदारांना बिलासाठी तीन महिने प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन व प्रशासकीय खर्च यावर दर महिन्याला ६८ कोटी रु. खर्च करावे लागतात. ही रक्कम गोळा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. याची आयुक्तांनाही जाणीव आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात एलबीटी रद्द झाल्यानंतर शासनाकडून अपेक्षित अनुदान न मिळाल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पाचा अभ्यास करीत असल्याने आयुक्तांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दुसरीकडे पैशाची कमतरता नाही. शहराचा विकास होईल. घोषणा पूर्ण करू, असा दावा रमेश सिंगारे करीत आहेत. परंतु तूर्त या घोषणा हवेतच आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Awaiting the approval of Commissioner for the budget