परतावा देण्यास टाळाटाळ; बीएसएनएलला दंड
By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST
नांदेड: टेलीफोन कनेक्शनचा परतावा देण्यास टाळाटाळ करणार्या बीएसएनएल कंपनीस दंड आकारुन ग्राहकास तात्काळ परतावा रक्कम देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले़
परतावा देण्यास टाळाटाळ; बीएसएनएलला दंड
नांदेड: टेलीफोन कनेक्शनचा परतावा देण्यास टाळाटाळ करणार्या बीएसएनएल कंपनीस दंड आकारुन ग्राहकास तात्काळ परतावा रक्कम देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले़ पुरुषोत्तम विनायकराव जकाते रा़ हडको नांदेड यांनी बीएसएनएल कंपनीचा लँडलाईन फोन कनेक्शन घेतले होते़ फोन घेताना अनामत रक्कम ६ हजार रुपये त्यांनी कंपनीकडे जमा केली होती़ सदरील फोनची आवश्यकता नसल्याने जकाते यांनी फोन कंपनीकडे जमा करुन कनेक्शन बंद करण्याबाबत अर्ज केला़ २०१३ मध्ये फोन जमा केल्यावर अनामत रक्कम परत देण्यासाठी त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला़ त्यावेळी सदरील रक्कम घरपोच चेकद्वारे मिळेल असे सांगण्यात आले़ अनेक महिने लोटले तरी परतावा रक्कम परत मिळत नसल्याने जकाते यांनी माहिती अधिकाराअंतर्गत कार्यवाहीचा तपशील मागविला़ त्यावेळी बीएसएनल कार्यालयाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ परतावा देण्यासाठी बीएसएनएल कार्यालयाकडून निष्काळजीपणा होत असल्याने याविरोधात जकाते यांनी जिल्हा ग्राहक मंचात दाद मागितली़ परतावा देण्याची प्रक्रिया मुंबई येथील मुख्य शाखेकडून पार पाडल्या जात असल्याने विलंब झाला़ तसा ६२०० रुपयांचा चेक अर्जदारास दिल्याचा खुलासा कार्यालयाकडून करण्यात आला़ तरीही अनामत रक्कम देण्यास विलंब झाल्याची बाब निदर्शनास आणून देत अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ५ हजार व दावा खर्चापोटी २ हजार रुपये अदा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचच्या अध्यक्षा स्मिता बी़ कुलकर्णी व सदस्य आऱएच़ बिलोलीकर यांनी ९ जुलै रोजी पारित केले़