‘आठवड्यातून एक दिवस पेट्रोल-डिझेलचा वापर टाळा’

By Admin | Updated: March 27, 2017 04:43 IST2017-03-27T04:43:16+5:302017-03-27T04:43:16+5:30

आठवड्यातून एक दिवस पेट्रोल आणि डिझेलचा वापर टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना

'Avoid using petrol and diesel once a week' | ‘आठवड्यातून एक दिवस पेट्रोल-डिझेलचा वापर टाळा’

‘आठवड्यातून एक दिवस पेट्रोल-डिझेलचा वापर टाळा’

नवी दिल्ली : आठवड्यातून एक दिवस पेट्रोल आणि डिझेलचा वापर टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.
मोदीं यांनी ‘मन की बात’मधून देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी कॅशलेस इंडियात सहभागी होणाऱ्यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, सव्वाशे कोटी देशवासीयांत बदल व्हावा अशी इच्छा आहे. यातूनच न्यू इंडियाची पायाभरणी होणार आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. सर्वांनी निर्धार केला आणि प्रयत्न केले तर न्यू इंडियाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
‘मन की बात’मधून शहिदांना श्रद्धांजली
तिसाव्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली अर्पिली. या तिघांना ब्रिटिश सरकार घाबरायचे. भगतसिंग सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत.

Web Title: 'Avoid using petrol and diesel once a week'