जिल्ातील ४५ वसतीगृहांचे अनुदान रोखले बायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ
By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा बायोमेट्रिक अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणार्या जिल्ातील ४५ अनुदानित वसतीगृहांचे वेतन आणि वेतनेत्तर अनुदान रोखण्यात आले आहे़ उपस्थिती अहवाल सादर केल्याशिवाय अनुदान दिले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे़
जिल्ातील ४५ वसतीगृहांचे अनुदान रोखले बायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा बायोमेट्रिक अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणार्या जिल्ातील ४५ अनुदानित वसतीगृहांचे वेतन आणि वेतनेत्तर अनुदान रोखण्यात आले आहे़ उपस्थिती अहवाल सादर केल्याशिवाय अनुदान दिले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे़जिल्ात असलेल्या एकूण २०५ अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल समाजकल्याण विभागाने मागविला होता़ त्यातील १६० वसतीगृह चालकांनी उपस्थितीचा अहवाल सादर केला तर उर्वरित ४५ वसतीगृह चालकांनी मात्र हा अहवाल सादर केला नाही़ वारंवार सूचना देवूनही अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या वसतीगृहांचे वेतन आणि वेतनेत्तर अनुदान रोखण्याची कारवाई केल्याचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी सांगितले़ बायोमेट्रिक उपस्थितीशिवाय अनुदान देण्याबाबत वसतीगृह चालकांकडून निवेदन दिले जात असले तरी बायोमेट्रिक उपस्थिती अहवाल अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ दरम्यान, जिल्ात २०५ वसतीगृहात आजघडीला ८ हजार ७३० विद्यार्थी आहेत़ त्यातील १८२ वसतीगृहात बायोमेट्रिक मशीन आहेत तर २३ वसतीगृहात मशीनच नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे़ या वसतीगृहांवरील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे़ चौकट - ऑनलाईन प्रवेशप्रक्रियाजिल्ात असलेल्या अनुदानित वसतीगृहात इयत्ता ५ ते १० वीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ ८ जुलैपासून ही प्रवेशप्रकिया सुरू होत आहे़ ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी स्पष्ट केले़ आधार कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही़ त्यातून बोगस विद्यार्थ्यांवर आळा बसेल असेही ते म्हणाले़