तणावमुक्त राहून अपघात टाळा
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:31+5:302015-02-15T22:36:31+5:30
रेल्वे अपघात टाळून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल (फोटो रॅपवर सेफ्टी सेमिनार नावाने)

तणावमुक्त राहून अपघात टाळा
र ल्वे अपघात टाळून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल (फोटो रॅपवर सेफ्टी सेमिनार नावाने)तणावमुक्त राहून अपघात टाळाआलोक कंसल : सुरक्षेबाबत दपूम रेल्वेत कार्यशाळानागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपले कार्य करताना रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्याचे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केले.दपूम रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने सदर माऊंट रोड येथील रेल्वे क्लबमध्ये आयोजित सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. गुप्ता होते. कार्यशाळेत विभागातील १७५ कर्मचारी सहभागी झाले. कार्यशाळेत गाड्यांच्या परिचालन आणि सुरक्षेशी निगडित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे कोचची स्टेशन परिसरात सुरक्षा, गेटमनचे कर्तव्य, लोकोपायलटने लाल सिग्नल ओलांडू नये, दुर्घटना घडल्यास एका तासात मदतकार्य करणे आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी दुर्घटना थांबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यशाळेला वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. एम. मसराम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...............