कंधारात पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा उपसा

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:27+5:302015-07-06T23:34:27+5:30

ऊस, सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी घायकुतीला

Available water leakage to save crops in Kandahar | कंधारात पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा उपसा

कंधारात पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा उपसा

, सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी घायकुतीला
कंधार : तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे़ पावसाची प्रतीक्षा न करता अनेक शेतकर्‍यांनी उपलब्ध जलसाठ्याचा वापर ऊस, सोयाबीन, कापसासाठी केला जात असून कोरडवाहू शेतकर्‍यांची पंचायत झाली आहे़ पावसाअभावी शेतकरी घायकुतीला आल्याचे विदारक चित्र समोर आले आहे़
तालुक्यात मृगनक्षत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी उत्साहित झाला़ खरीप हंगामात ओळख असलेला हा भाग नाममात्र सिंचनाखाली आहे़ सहा मंडळांतर्गत ६८५७७़४७ हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असले तरी बारमाही सिंचनक्षेत्र नामधारी आहे़ ऐन पावसाळ्यातील चार महिने शेतकरी निसर्ग पावसावर विसंबून असतो़ कारणही तार्किक आहेच़ परंतु निसर्ग एवढा रुसणार अशी शंका व्यक्त केली जात नाही़ मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले़ सलग दुसर्‍या वर्षीही पावसाने दडी मारली़ त्यामुळे शेतकरी चलबिचल झाला आहे़ पावसाळ्यात उसाला निसर्ग पावसाची मदत होते़ परंतु खरीप हंगाम निसर्ग पावसाशिवाय तग धरू शकत नाही़ तरीही जलसाठा उपलब्ध असल्यास त्याचा वापर केला जातो़
कंधार मंडळांतर्गत १०२ हे़नवीन ऊस आहे़ तसेच खोडवा ऊस १२४़८० हे़ लागवड आहे़ हळद-१६७़२० व आद्रक २९ हे़ आहे़ सोयाबीन ३६६० व कापूस ३५२० हे़ आहे़ कुरुळा मंडळांतर्गत नवीन ऊस २७ हे़, खोडसा ऊस ११३ हे़ आहे़ हळद १४़, सोयाबीन ४९८८ हे़, कापूस २४६१ हे़ लागवड आहे़ फुलवळ मंडळांतर्गत नवीन ऊस ३३ हे़, हळद ७५़, सोयाबीन ३२८३़७० हे़, कापूस ३५४६ हे़ लागवड आहे़ उस्माननगर मंडळांतर्गत नवीन ऊस ७़५०हे़, हळद १३२ हे़, सोयबाीन ३३३४ हे व कापसाची लागवड ३९५५ हे़ वर करण्यात आली़ बारूळ मंडळांतर्गत नवीन ऊस ६३ हे़, खोडसा ऊस २०९ हे़, आद्रक-२२ हे़, हळद १५१ हे़, सोयाबीन ३०५७ हे़ आणि कापूस ४४६५ हे़ लागवड करण्यात आली़ पेठवडज मंडळांतर्गत खोडवा ऊस - १ हे़ , हळद ४४ हे़, सोयाबीन २१५१ व कापूस २३८४ हेक्टरवर लागवड करण्यात आली़
गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने नदी, नाले, तलावात अपेक्षित साठा जमण्याची शक्यता फोल ठरली़ विहीर, विंधन, विहिरीची पाणीपातळी खोलवर गेली़ अनेक बोअरचे पाणी १२० फुटाखाली गेले़ अनेक बोअर कोरडे गेले़ पिण्याचा पाणीप्रश्न व पशूधनाचा पाणीप्रश्न गंभीर झाला़ यावर्षी पाऊस चांगला होईल, ही अपेक्षा सद्यस्थितीत समाधानकारक नाही़ तीन आठवड्यापासून पावसाने गुंगारा दिला आहे़ जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पाऊस झाला़ तिसर्‍या आठवड्यापासून पाऊस दबा दिला आहे़ त्यासाठी मोजक्याच शेतकर्‍यांकडे पाण्याची सोय आहे़ त्यात नवीन व खोडवा ऊस ६८७़३० हे़ असून त्याला जगविण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे़ काहींनी सोयाबीन, कापूस, आर्द्रक, हळदीसाठीही पाण्याचा उपसा चालविला आहे़ पिकाला जगविण्यासाठी धडपड केली जात आहे़ निसर्ग पावसाचा लहरीपणा व पाण्याचा उपसा यात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याचा प्रसंग येवू नये, अशी धारणा झाली आहे़
कोरडवाहू शेतकर्‍यांची केविलवाणी अवस्था झाली आहे़ कापूस लागवड करणारे दूरवरून घागरीने पाणी आणून पिके जगवितानाची कसरत करताना नाकीनऊ आले आहे़ पिकांनी माना टाकायला सुरुवात केल्याने आता रडणे, उदास होणे अशा प्रक्रियांतून शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे़ महागडे बी-बियाणे, जमिनीत टाकून खते, मशागतीने शेतकर्‍यांचा खिसा रिकामा झाला आहे़

Web Title: Available water leakage to save crops in Kandahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.