आज ऑटोरिक्षा बंद!
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30
आज ऑटोरिक्षा बंद!

आज ऑटोरिक्षा बंद!
आ ऑटोरिक्षा बंद!- नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाचे आवाहननागपूर : ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीने कल्याणकारी मंडळाचा प्रारूप अहवाल सादर केला, मात्र यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याशिवाय अवैध वाहतूक बंद करण्यासंदर्भात शासन उदासीन असल्याने आणि अटल पेन्शन योजना केवळ ४० वर्षांच्या ऑटोचालकापुरतीच मर्यादित असल्याने याविरोधात नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाने बुधवारी ऑटोरिक्षा बंदचे आवाहन केले आहे.ऑटोरिक्षाचालकाला जनतेचा सेवक असे संबांधेले जाते, परंतु शासन त्याला नागरी सेवेचा दर्जा देत नाही. पेन्शन, आरोग्य विमा योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आदी पोकळ आश्वासनच देत आल्याची टीका रिक्षाचालक संघटनांनी केली आहे. महासंघाचे महासचिव हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले, राज्यातील साडेसहा लाख तर विदर्भातील ८० हजार ऑटोचालकांना केवळ आश्वासनांची पाने पुसली जात आहेत. ठोस कारवाई होत नाही. नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बैठक झाली. यात त्यांनी ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते, याशिवाय अवैध वाहतुकीवरही कारवाई करण्याची ग्वाही दिली होती, परंतु उपाययोजना नाहीच. उलट केंद्र शासनाच्या तीन योजना स्वीकारा नाही तर परवाना नूतनीकरण होणार नाही, या प्रकारचा दबाव आणला जात आहे. म्हणूनच अखिल भारतीय कामगार संघटना, संयुक्त समितीद्वारा घोषित बंदमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. या बंदला १२ विविध संघटनांनी समर्थन दिले आहे. बुधवारी नागपुरातील खासगी व व्यावसायिक असे २५ हजारावर ऑटोरिक्षा बंदमध्ये सहभागी होतील. तसेच सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. -बंदला विरोधआदर्श ऑटोरिक्षा चालक सेवा संघाने बंदला विरोध केला आहे. संघाचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले, हा बंद ऑटोरिक्षा चालकांच्या विरोधात आहे. काही संघटना रिक्षाचालकांना हाताशी धरून राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.बॉक्स...- या आहेत मागण्या: ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी योजना लागू करावी.: अवैध वाहतूक बंद करण्यात यावी: ऑटोरिक्षा पार्किंगची व्यवस्था व्हावी: सहा महिन्यावर रद्द झालेल्या ऑटो परवानाचे नूतनीकरण करण्यात यावे: ऑटोचालकांना घरे देण्यात यावी