रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टला द्वितीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:10 AM2019-09-27T02:10:51+5:302019-09-27T02:10:54+5:30

जगभरातून ४० देशांचे संघ सहभागी; अंतिम फेरीत दोन संघांची धडक

Aurangabad's Robonist second prize in the Robotics Championship | रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टला द्वितीय पुरस्कार

रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टला द्वितीय पुरस्कार

Next

नवी दिल्ली : पाचव्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टने दुसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्लीत सलग तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत दहा संघ होते. रोबोनिस्टच्या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम विजेत्यांच्या यादीत रोबोनिस्टच्या सिनिअर संघाला दुसरे तर ज्युनिअर संघाला पाचवे स्थान मिळाले.

आॅल इंडिया कॅन्सिल फॉर रोबोटीक्स आॅटोमेशनच्या वतीने पाचव्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धा-टेक्नोशियान-२०१९ चे आयोजन करण्यात आले होते. त्यागराज स्पोर्टस कॅम्पलेक्समध्ये झालेल्या स्पर्धेत ४० देशांमधील संघ सहभागी झाले होते.
विजेत्या संघात आर्यवीर दर्डा, प्रिथ्वीर गाडेकर, रेयांश माछार, रिध्दिमा तुलशन, शुभम कागलीवाल, असीम राक्षसभुवनकर, नील मापारी, ओंकार बोरडे, मैत्रेय दुसाने, श्रीवर्धन टाकळकर, प्रणव वेदपाठक, सिद्धांश शर्मा, समर्थ जोशी, योगेश मोरे, कौस्तुभ कुलकर्णी, आंचल सक्सेना व पी. ए. प्रत्यूक्ष यांचा समावेश होता. रोबोनिस्टचे प्रशिक्षक दीपक कोलते, चेतन पवार, सनी सुरवाडे, निमिष पाटणी, अभिजीत बेडके, मोझेस खरात व अश्विन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेची अंतिम फेरी उत्कंठा वाढवणारी होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या संघांशी रोबोनिस्टचा सामना होता. आपल्या रोबोटला अडथळ्याची शर्यत (रोबो रेस) पार करता यावी यासाठी प्रत्येक संघ घडपडत होता. त्यासाठी त्यांना दोनदा संधी मिळणार होती.
सर्वात मोठे आव्हान ट्रॅकवर असलेले शेवटचे दोन अडथळे पार करणे हेच होते, अशी माहिती दीपक कोलते यांनी दिली. शेवटचे दोन्ही अडथळे पार केल्याशिवाय पूर्ण गुण मिळणे शक्यच नव्हते. त्यासाठी रोबोनिस्टच्या सिनिअर व ज्युनिअर संघातील सदस्यांनी परस्परांशी चर्चा केली. या सामन्यात रोबेट संचालन (ओपरेटर) करणाऱ्याा प्रणवने योग्य जबाबदारी निभावली. मात्र दुदैर्वाने पहिल्या फेरीत अडथळा पार करण्यात अपयश आले. ज्युनिअर टीमनेही स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली. संयम व विश्वासाने संचालन करणाºया प्रिथ्वीरच्या प्रयत्नांमुळे रोबोटने अडथळे पार केले. अशा प्रकारे कमी वेळात विक्रमी कामगिरी करीत इतर संघांना मागे टाकण्यात ज्युनिअर टीमला यश मिळाले. नियमांचे काटेकोर पालन करुन ऐनवेळी रोबोटमध्ये काही बदलही करण्यात आले होते. त्यामुळेच दुसरी फेरीतील अडथळे रोबोनिस्ट संघाच्या रोबोटने सहजपणे पार केले.

रोबोटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून मुलांना खूप शिकायला मिळते. दरवर्षी नव्या गोष्टी कळतात. मुलांमध्ये वर्षभर अशा स्पर्धेसाठी तयारी करण्याची जिद्द निर्माण होते. स्पर्धा संपल्यावर आम्ही प्रत्येक सहभागी संघाशी संवाद साधला. त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान, रोबोट तयार करण्यासाठीचे साहित्य यांची माहिती घेतली. विद्यार्थीच नव्हे तर प्रशिक्षकांसाठीदेखील ही शिकण्याची मोठी संधी असते. - दीपक कोलते, रोबोनिस्टचे प्रशिक्षक

Web Title: Aurangabad's Robonist second prize in the Robotics Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.