ऑगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा

By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:09+5:302015-06-06T00:11:09+5:30

मेहेरचा प्रस्ताव : सी प्लेनच्या माध्यमातून वाहतूक

From August to Nashik-Mumbai Airlines | ऑगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा

ऑगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा

हेरचा प्रस्ताव : सी प्लेनच्या माध्यमातून वाहतूक
नाशिक : सी प्लेनच्या माध्यमातून नाशिकहून पुणे विमानसेवा १५ जूनपासून सुरू होत असून, त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात नाशिक ते मुंबई विमानसेवाही सुरू होणार आहे. ओझर ते जुहूदरम्यान १५ ऑगस्टपासून ही सेवा सुरू होईल.
सी प्लेनच्या योजनेसंदर्भात उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत मेहेरचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा यांनी ही माहिती दिली. नाशिक ते पुणे ही विमानसेवा केवळ सोमवार ते शुक्रवार अशीच असणार आहे. सी प्लेनच्या क्षेत्रात काम करणार्‍या मेहेर कंपनीने गंगापूर धरणाचा वापर करून नाशिक ते मुंबई सेवा देण्याची तयारी यापूर्वी केली होती. तथापि, त्याला विरोध झाल्याने कंपनीने जमिनीवरून टेक ऑफ करणारे तसेच उतरणारे तसेच पाण्यावरून झेपावू शकेल अशा विमानाच्या माध्यमातून नाशिक- पुणे सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. ओझर ते लोहगाव या विमानसेवेसाठी याच सी प्लेनचा वापर करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे सेवेसाठी तूर्तास नऊ आसनी विमानाचा वापर केला जाणार आहे, असे वर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: From August to Nashik-Mumbai Airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.