शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:35 IST

शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:  शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आणि सुविधांचे लेखापरीक्षण (सुरक्षा ऑडिट) करणे अनिवार्य आहे, असा आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना शनिवारी दिला आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील सरकारी शाळेचा भाग कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा आदेश जारी करण्यात आला.

शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे. शाळांमधील आणि विद्यार्थ्यांशी संबंधित सुविधा व यंत्रणांचे सुरक्षा ऑडिट करावे, आपत्कालीन काळात कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. शाळेच्या इमारतींची स्थिती, अग्निसुरक्षा व वीज जाळ्यांची स्थिती यांची तपासणी होणे आवश्यक आहे. 

‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही जपा’

शिक्षण खात्याने म्हटले की, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्याकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशमन दल, पोलिस, वैद्यकीय संस्था यांच्या सहकार्याने नियमित प्रशिक्षण शिबिरे व मॉक ड्रील आयोजित करावी. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यावरही भर द्यायला हवा.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारSchoolशाळाEducationशिक्षण