अपंगांना मिळणार श्रवणयंत्र महिला बालकल्याण समिती : अंगणवाडीतही अभिप्राय वही ठेवणार

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

अहमदनगर : जिल्‘ाच्या ग्रामीण भागातील अपंग महिला आणि बालकांना श्रवणयंत्र पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती नंदा वारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Audiences Woman Balikalan Samiti to get the disabled: They will also keep feedback on the Aanganwadi | अपंगांना मिळणार श्रवणयंत्र महिला बालकल्याण समिती : अंगणवाडीतही अभिप्राय वही ठेवणार

अपंगांना मिळणार श्रवणयंत्र महिला बालकल्याण समिती : अंगणवाडीतही अभिप्राय वही ठेवणार

मदनगर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपंग महिला आणि बालकांना श्रवणयंत्र पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती नंदा वारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
बैठकीत विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. चौथी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणार्‍या मुलींना स्व संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय मागील सभेत घेण्यात आला होता. सोमवारच्या सभेत कराटे प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाच हजारहून अधिक असणार्‍या अंगणवाडीत अभिप्रायवही छापून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीला सदस्या योगिता राजळे, कांचन मांढरे, निर्मला गुंजाळ, अर्चना पानसरे, सकुबाई केदार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते.
.........................

Web Title: Audiences Woman Balikalan Samiti to get the disabled: They will also keep feedback on the Aanganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.