देश-परदेश/ कोळसा खाणींचा लिलाव

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:13+5:302015-02-14T23:50:13+5:30

पहिली कोळसाखाण रिलायन्सला

Auction of foreign countries / coal mines | देश-परदेश/ कोळसा खाणींचा लिलाव

देश-परदेश/ कोळसा खाणींचा लिलाव

िली कोळसाखाण रिलायन्सला
७९८ कोटींची बोली: १९ खाणींसाठी ई-लिलाव सुरु
नवी दिल्ली: कोळसा खाणींवरील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणून कोळसा खाणपट्ट्यांचे खासगी उद्योगांना लिलावाने वाटप करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली. त्यानुसार झालेल्या ई-लिलावात ७९८ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत रिलायन्स सिमेंट कंपनीने पहिली कोळसाखाण पटकावली.
कोळसा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सियाल घोघरी खाणपट्ट्यासाठीच्या लिलावात रिलायन्स सिमेंटने हिंदुस्तान झिंक लि. आणि ओसीएल आयर्न ॲण्ड स्टील कंपनीला मात दिली. या खाणपटट्यात एकूण १,४०२ दशलक्ष टन कोळसासाठे असून त्यापैकी ५.९ दशलक्ष टन काढणे शक्य आहे. रिलायन्सने यासाठी प्रति टन १,४०२ रुपये या दराने बोली लावली होती. याआधी प्रशासकीय निर्णयाने ही खाण प्रिझम सिमेंट कंपनीस दिली गेली होती. ही खाण विजेखेरीज अन्य उद्योगांसाठी राखीव आहे.
ओडिशातील तालिबिरा-१ या आणखी एका खाणपट्ट्याचा ई-लिलावही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होता. हे वृत्त देईपर्यंत त्याचा निकाल झाला नव्हता. या लिलावासाठी अदानी पॉवर, एस्सार, जीएमआर, वेदांत आणि आदित्य बिर्ला उद्योग समुहातील कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने २०४ खाणपट्ट्यांचे वाटप रद्द केले होते. त्या खाणी ई-लिलावाने विकण्याचे सरकारने ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
----------------------
कोट
लिलाव जोमाने सुरु आहे. ही पद्धत सरकारसाठी उत्तम आहे कारण यातून राज्यांना चांगला महसूल मिळेल.
-अनिल स्वरूप, कोळसा सचिव

Web Title: Auction of foreign countries / coal mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.