बिहार निवडणुकांनंतर पण दिवाळीपूर्वी OROPची अधिसूचना काढण्याचा प्रयत्न - पर्रीकर
By Admin | Updated: October 26, 2015 15:25 IST2015-10-26T15:25:47+5:302015-10-26T15:25:47+5:30
बहुप्रतिक्षीत वन रँक वन पेन्शन किंवा OROPची घोषणा दिवाळीपूर्वी व बिहार निवडणुकांनंतर करण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सांगितले

बिहार निवडणुकांनंतर पण दिवाळीपूर्वी OROPची अधिसूचना काढण्याचा प्रयत्न - पर्रीकर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - बहुप्रतिक्षीत वन रँक वन पेन्शन किंवा OROPची घोषणा दिवाळीपूर्वी व बिहार निवडणुकांनंतर करण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सांगितले. सप्टेंबर ५ रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती, परंतु त्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती. सदर अधिसूचना बिहार निवडणुकांनंतर काढण्यात येणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.
दिवाळी ११ नोव्हेंबर रोजी सुरू होत असून त्यापूर्वी अधिसूचना काढण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारमधल्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा ५ नोव्हेंबर रोजी असून बिहारची सत्ता कोण मिळवणार याचा निकालही दिवाळीपूर्वीच लागणार आहे.
OROP ही योजना १ जुलै २०१४ पासून लागू होणार असून निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी २०१३ हे पायाभूत वर्ष गृहीत धरण्यात येणार आहे व दर पाच वर्षांनी सुधारीत श्रेणीचा विचार करण्यात येणार आहे.