अशोकस्तंभातील घटकांना अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:03+5:302015-08-14T23:35:03+5:30
---ओळींसारखेच छोटे मॅटर घ्यायचे आहे. आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.

अशोकस्तंभातील घटकांना अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न
--- ळींसारखेच छोटे मॅटर घ्यायचे आहे. आवश्यकतेप्रमाणे घेता येईल. - चित्रकार दीनानाथ पडोळे यांचे स्केच : देशाच्या प्रगतीची संकल्पना रेखाचित्रातून नागपूर : अशोक स्तंभ सर्वांनीच पाहिलेला आहे. पण एखाद्या कलावंतांला अशोक स्तंभातूनही एखादी भन्नाट कल्पना साकारावी वाटली तर त्यातून एक विचार समोर येतो. ज्येष्ठ चित्रकार आणि माजी आ. दीनानाथ पडोळे यांनी अशोक स्तंभाचे स्केच साकारले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी हे स्केच तयार केले आहे. पण आपण नेहमी पाहतो तसे हे अशोक स्तंभाचे चित्र नाही तर अशोक स्तंभात असणारे घटक वापरून त्यांनी या चित्रात अधिक जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशाचे प्रतीक सिंह आहेत. पडोळे यांच्या चित्रात राजा असलेला सिंह मात्र खडकावर उंच उभा आहे. एरवी अशोक स्तंभात केवळ तीन सिंह दिसतात पण यात त्यापेक्षा जास्त सिंह आहेत. घोडा हे प्रतीक त्यांनी घेतले आहे पण तो धावतो आहे. अर्थात देशाच्या प्रगतीसाठी गतीची गरज असल्याचे त्यांनी भासविले आहे. खडकावर उभे असलेले वाघ चारही दिशांवर नजर रोखून आहेत. जगाच्या तुलनेत भारत कुठेही कमी नाही कारण भारताची नजर चौफेर आहे, हा विचार त्यामागे आहे. त्यात अशोकचक्रही धावतेच आहे. बदलणाऱ्या स्थितीशी जुळवून घेत भारताची कमान अधिक उंच होण्याचा आशावाद त्यांनी यातून व्यक्त केला आहे. जनप्रतिनिधी म्हणून विधानसभा गाजवणारे दीनानाथ पडोळे आता चित्रकार म्हणून विचार करीत आहे. जनप्रतिनिधी असताना आवड जोपासण्यासाठी वेळ मिळाला नाही पण आता चित्र खुणावताहेत, असे ते म्हणाले. एका बारीक पेनने केलेले काम विलक्षण सूक्ष्म आणि रेखीव आहे.