शेवटच्या श्वासापर्यंत कन्हैया आणि उमरला मारण्याचा करणार प्रयत्न - अमित जानी
By Admin | Updated: April 15, 2016 18:06 IST2016-04-15T18:01:59+5:302016-04-15T18:06:22+5:30
शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत जेएनयू नेता कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना मारण्याचा प्रयत्न करू अशी धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे नेते अमित जानी याने दिली.

शेवटच्या श्वासापर्यंत कन्हैया आणि उमरला मारण्याचा करणार प्रयत्न - अमित जानी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत जेएनयू नेता कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना मारण्याचा प्रयत्न करू अशी धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे नेते अमित जानी यांनी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान जेएनयू कँपसमध्ये जाणा-या बसमध्ये हत्यारे व धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी कन्हैया व उमर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि धमकीनंतर अमित जानी याने फोन बंद केला असून तो गायब झाला आहे.
जेएनयू येथून आयएसबीटी येथे जाणा-या एका बसमध्ये पोलिसांना एका बॅगमध्ये एक पत्र तसेच गावठी रिव्हॉल्व्हर आणि काही गोळ्या सापडल्या. त्या पत्रात कन्हैया व उमरचे मुंडके उडवण्याची धमकी दिली होती व त्यावर अमित जानी याची सही होती' अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर कन्हैया व उमरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ते पत्र चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले.
दरम्यान अमित जानी याने यापूर्वीही कन्हैया व उमर याला ठार मारण्याची धमकी दिली होती.