शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ‘कर्तव्यपथ’; बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 10:22 IST

भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. १५ डिसेंबर १९११ रोजी ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील रस्त्याला किंग्ज वे हे नाव देण्यात आले होते. किंग्ज वेचे भाषांतर करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्याचे नाव राजपथ असे ठेवण्यात आले होते.

शरद गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा स्वातंत्र्यदिनी पाच उद्दिष्टे जाहीर केली होती. राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करणे हा त्याच उद्दिष्टांचा एक भाग आहे. गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे कर्तव्यपथ असे त्याचे वर्णन केले जाते. भारतीय भाषांतील शिक्षणापासून ते बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा केलेला समावेश अशा अनेक गोष्टी मोदी सरकारने आवर्जून केल्या आहेत. 

भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. १५ डिसेंबर १९११ रोजी ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील रस्त्याला किंग्ज वे हे नाव देण्यात आले होते. किंग्ज वेचे भाषांतर करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्याचे नाव राजपथ असे ठेवण्यात आले होते.

मोदी सरकारने नौदलाच्या ध्वजावरील सेंट जॉर्जचा क्रॉस हटविला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेवरून प्रेरणा घेऊन नौदलाची नवी मुद्रा तयार करण्यात आली. त्यासहित नौदलाचा नवा ध्वज डौलाने फडकू लागला. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिल्लीतील रेस कोर्स रोडचे लोककल्याण मार्ग असे नामकरण केले. 

अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा बदललीब्रिटिश राजवटीत चालत आलेली ९२ वर्षांची परंपरा तोडून मोदी सरकारने सर्वसामान्य अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट केला. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धती मोडीत काढून फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. १५०० हून अधिक जुनाट कायदे मोदी सरकारने रद्द केले. इंडिया गेटजवळ आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा  बसविण्यात आला आहे.

एसटी महामंडळाला कोरोना पूर्व काळात  श्रावण आणि गणेशोत्सवाचे ५५० ते ६०० कोटींचे उत्पन्न मिळत होते. कोरानानंतर एसटी हळूहळू पूर्वपदावर येत असून ऑगस्टमध्ये ४५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. -  शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा