शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:20 IST

खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे.

नवी दिल्ली : ईडीसारख्या तपास संस्थांच्या मदतीने शिवसेनेच्या आमदार व खासदारांना त्रस्त करून लोकशाही मार्गाने निवडून आलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे. केंद्रातील सरकारशी जुळून राहिले पाहिजे, असा याचा अर्थ होत नाही. शिवसेनेचे खासदार, आमदार व त्यांच्या  नेत्यांच्या नातेवाईकांवर मनी लॉँड्रिंगचे गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवून त्रस्त करण्यात येत आहे. सत्तेत असलेला पक्ष तपास यंत्रणांचा गैरवापर करू शकत नाही. हे सुदृढ लोकशाहीचे निश्चितच लक्षण नाही, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.

जेलची हवा खावी लागेल -जवळपास एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करा, असा प्रस्ताव त्या लोकांनी माझ्यासमोर ठेवला. माझा उपयोग करून राज्यात मध्यावधी निवडणुकीची स्थिती यावी, असा प्रयत्न होता. अशा गुप्त अजेंड्याचा भागीदार होण्यास मी नकार दिला. मला असा इशारा देण्यात आला की, जर आपण सहकार्य केले नाही तर आपली स्थिती कारागृहात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसारखी होईल, असे सांगण्यात आले. 

धाकदपटशा दाखवला -एवढेच नव्हे तर २००३ मध्ये खरेदी केलेल्या १ एकर जागेच्या खरेदीवरून व नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या माझ्या मुलीला व या लग्नात विविध काम केलेल्या लोकांना धाकदपटशा दाखवून माझ्या विरोधात पोलिसांकडे कबुलीजबाव देण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचेही या पत्रात खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

ईडी भाजपच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग --   ईडी व इतर तपास यंत्रणा भाजपच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग असून, हे सिंडिकेट लवकरच आपण उघड करू, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. -    उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना पत्र पाठविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, ईडीचेही आर्थिक घोटाळे आहे. ते वसुली एजंट म्हणून काम करीत आहेत. -    दमन चक्र सुरू आहे. संघराज्य पद्धतीचे वाट लावली आहे. या दमन शक्तीचा वापर करून दुसऱ्यांचे गळे दाबण्याचे काम सुरू आहे. या दमन शक्तीला जुमानणाऱ्यांपैकी मी नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याचा राग त्यांना आहे. शरद पवार यांच्याकडे पाच दिवस ईडीचे लोक ठाण मांडून बसले होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाShiv Senaशिवसेना