शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'पीडित कुटुंबीयास 50 लाख रुपये देत खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव, गुन्हे दाखल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 17:57 IST

Hathras Gangrape : विरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे. त्यामुळे आता ते कट-कारस्थान करत आहेत, असे म्हणत, भाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

लखनौ - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे उत्तर प्रदेशच्या एडीजींनी (कायदा व सुव्यवस्था )म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेच्या आडून राज्यातील शांतता बिघडवणे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित कुटुंबीयांवर खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचेही एडीजी प्रशांत कुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अशाच प्रकारे माहिती दिली आहे.  विरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे. त्यामुळे आता ते कट-कारस्थान करत आहेत, असे म्हणत, भाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आमचे विरोधक आंतरराष्‍ट्रीय फंडिंगच्या माध्यमाने जात आणि संप्रदायावर आधारीत दंगलींचा पाया घालून आमच्या विरोधात कट-कारस्थान आखत आहेत. गेल्या आठवडाभरापासून विरोधकांना राज्यात दंगली बघायच्या आहेत. मात्र, सर्व कटांवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे योगींनी म्हटले आहे. त्यानंतर, आता युपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनीही योगींची री ओढल्याचे दिसून येते.

 

रविवारी हाथरस येथे कोविडच्या बंधनांचे उल्लंघन करत, नागरिकांनी हिंसात्मक पाऊल उचलल्याचे दिसून आले. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, सोशल मीडियावर समाजविघातक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर, पीडित कुटुंबीयांना पैशाचे लालच दाखवून, 50 लाख रुपये देऊन जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याप्रकरणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले. 

इस्लामिक देशांकडून फंडिंग

तत्पूर्वी, संरक्षण संस्थांनी विरोधाआडून राज्यात जातीय दंगे घडवण्याचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा मोठा कट रचला जात आसल्याचा खुलासा केल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या म्हणण्या प्रमाणे, एका वेबसाईला इस्‍लामिक देशांकडून फंडिंग होत होते. एम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल संस्‍थेशीही याचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी