शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, हायकोर्टाकडून मुलाला लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:57 IST

Court News: आपल्या वृद्ध आईच्या हक्काच्या घराची विल्हेवाट लावण्यासाठी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. 

- डाॅ. खुशालचंद बाहेतीचंदीगड : आपल्या वृद्ध आईच्या हक्काच्या घराची विल्हेवाट लावण्यासाठी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. राजकुमार गोयल यांनी मृत्यूपूर्वी आपल्या स्वत:च्या घराची दोन भागात वाटणी केली. अर्धा हिस्सा मुलाला व अर्धा पत्नीला दिला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुलाने आईकडून तिच्या वाट्याच्या घराचे कुलमुख्त्यार पत्र करून घेतले. या मुख्त्यारपत्राच्या आधारे त्याने आईच्या वाट्यातील घराची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यास आई व मामाने विराेध केला. मुलाने दोघांविरुद्ध पाेलिसांत तक्रारी केल्या. पुढे मुलाने मुख्त्यार पत्राच्या आधारे त्यास मालमत्तेची आपल्या मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. यात आई व मामांना दखल देण्यास मनाई करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखलकेली. न्या. अरविंदसिंग संगवान यांनी ही याचिका फेटाळताना मुलगा मुख्त्यारपत्र घेतल्यानंतर आईशी प्रामाणिक राहिला नाही. आईने दिलेल्या अधिकाराचा वापर तो वृद्धावस्थेत तिला घराबाहेर काढण्यासाठी करीत आहे हे दु:खद आहे, असे मत व्यक्तकेले. पोलिसांत दिलेली तक्रार आणि याचिका यातून मुलाचा लोभीपणा दिसून येतो, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुलाला एक लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. हे एक लाख रुपये दोन महिन्यांत वसूल करून आईला देण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. 

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार