शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:42 IST

अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे.

नवी दिल्लीः अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. भाजपाची ही खेळी अनेकांना पटलेली नाही. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंही यावर टीका केली.  केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.   महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. परंतु दोन्ही राजकीय पक्षांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार बनवलं नाही. तर पर्यायी सरकार बनवण्याचा ते दोघेही प्रयत्न करत राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी वारंवार केराची टोपली दाखवली. परंतु आज शिवसेना त्या काँग्रेसचंच समर्थन घेण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे काँग्रेसनंही भाजपा आणि शिवसेनेवर वारंवार सांप्रदायिकतेचा आरोप केला होता. आता तीच काँग्रेस आपल्या विचारधारेशी समझोता करण्यासाठी तयार आहे. ही तर लोकशाहीची विडंबना आहे. लोक जनशक्ती पार्टीवर बऱ्याचदा संधिसाधू असल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही कधीही जनतेच्या भावना आणि सिद्धांतांशी समझोता केलेला नाही. मला अभिमान आहे की, लोजपानं कोणतंही सरकार बनवण्यासाठी आडमुठी भूमिका घेतलेली नाही. पक्षाची स्थापना 2000 साली झाली. तेव्हापासून आम्ही निवडणूकपूर्व युती केली आणि एनडीए सोडून इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली नाही. भाजपानं महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं ते अगदीच चुकीचं आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019