नाटयगृहातील परवानग्या मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अटकेत
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:47+5:302015-09-03T23:05:47+5:30
नाटयगृहातील परवानग्या मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अटकेत

नाटयगृहातील परवानग्या मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अटकेत
न टयगृहातील परवानग्या मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अटकेतमुंबई - विलेपार्लेतील दिनानाथ नाटयगृहात कार्यक्रम करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने मिळवून देण्याच्या बदल्यात आयोजकांकडे १ हजार रूपयांची लाच मागणार्या अनिल काशीनाथ हळणकर(६१) या खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरूवारी नाटयगृहात घडली. अंध मुलांसाठी कार्यरत असलेल्या दृष्टी परिवार या संस्थेचा २३ सप्टेंबर रोजी वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन साजरा करण्यासाठी संस्थेने दिनानाथ नाटयगृह आरक्षित केले आहे. मात्र कार्यक्रमासाठी संस्थेला संबंधीत यंत्रणांकडून परवानग्या आवश्यक आहेत. त्या मिळवून देण्यासाठी हळणकर यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे १ हजार रूपयांची लाच मागितली होेती.