शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:04 IST

...त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत.

जितेंद्र प्रधानजयपूर : किर्गिझस्तानमध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान तेथे भारतातील तब्बल १५ हजार तरुण अडकले आहेत. यात महाराष्ट्र, राजस्थानमधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सतत हिंसाचार सुरू असल्याने आता भारतीय तरुण भीतीच्या छायेखाली वावरत असून, त्यांनी कुटुंबाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. तरुणांनी सांगितले की, होस्टेलमध्ये घुसून हिंसाचार करणारे अतिशय बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत.

भारतीय टार्गेटवर- बिश्केकमध्ये हिंसक जमाव वसतिगृहांना टार्गेट करत आहे. - या वसतिगृहांमध्ये भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानसह अनेक देशांतील विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि भारतीय विद्यार्थी टार्गेटवर आहेत.

येथे करा संपर्कमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली आहे. सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ९९६५५५७१००४१ हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.

नेमके काय झाले? एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली. व्हिडीओत प्रामुख्याने पाकिस्तान आणि इजिप्तमधील विद्यार्थी दिसत आहेत. १३ मेच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. लोक विद्यार्थ्यांना इतके मारत आहेत की यात विद्यार्थी बेशुद्ध झालेले दिसत आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदी