नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी भाजपाची टिंगल करताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘अच्छे दिना’चे वचन दिले होते ते दिवस कुठे गेले, असा सवाल केला.
लोकसभेत महागाईवर नियम 193 अंतर्गत चर्चा झाली. यामध्ये सहभागी होताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आवश्यक वस्तूंच्या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ही दरवाढ रोखण्यासाठी साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चर्चेला प्रारंभ केला. भाजपाने निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन दिले होते, ते दिवस गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला.
मालभाडे आणि पेट्रोल आणि डिङोलच्या किमती वाढवण्यात आल्याने वस्तूंच्या किमती वाढल्याचे माकपा नेते के. पी. करुणाकरण म्हणाले.
विरोधकांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या जी महागाई दिसत आहे, ती काँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात महागाई रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी महागाईवर बोलू नये, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खाद्यान्नांच्या किमती नियंत्रणात असून, घाबरण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य केले.
च्विरोधकांनी कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणो बंदी घालण्याची मागणी यावेळी केली.