भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत होता. या हल्ल्यात पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर १५ ब्राह्मोस डागले होते, याची माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका सूत्राने दिली.
९ आणि १० मेच्या रात्री, भारतीय हवाई दलाने इतर दलांच्या मदतीने पाकिस्तानच्या १३ पैकी ११ हवाई तळांना लक्ष्य केले आणि चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. भारतीय हवाई दलाच्या या कृतीमुळे असीम मुनीर यांच्या पाकिस्तानी सैन्यात चांगलीच खळबळ उडाली.
पाकिस्तानला हल्ला पडला महागात!पाकिस्तानी सैन्य भारतावर हल्ला करण्याचा सतत अयशस्वी प्रयत्न करत होते. या दरम्यान देशातील २६ ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यांनी लाहोरमध्ये असलेल्या शत्रूच्या रडारसह पाकिस्तानी हवाई संरक्षण रडारला लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानवर सुमारे १५ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली होती. भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये, पाकिस्तानचे भरपूर नुकसान झाले. या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व भारताचे संरक्षण प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी संयुक्तपणे केले. ही रणनीती अशा प्रकारे बनवण्यात आली की, पाकिस्तान स्वतःच फसला गेला.
पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले!पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी तुर्की बनावटीचे ड्रोन आणि चिनी शस्त्रे वापरली. मात्र, ही शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे भारतीय संरक्षण यंत्रणेसमोर एक मिनिटही टिकू शकली नाहीत. पाकच्या ड्रोननी भारतीय सीमेत प्रवेश करताच संरक्षण यंत्रणांनी त्यांना हवेतच उडवून टाकलं.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव का वाढला?२२ एप्रिल रोजीही पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६ मेच्या रात्री आणि ७ मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर करत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान बिथरला होता.