शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

'मैत्रीच्या प्रत्येक प्रतिकावर हल्ला, आता गप्प राहणे कठीण...'; बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात थरूर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 09:48 IST

"बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे.

बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ झाल्यानंतरही हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. तेथे अल्पसंख्यक हिंदूंना लक्ष केले जात आहे. यासंदर्भात आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाष्य केले आहे. "बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे.

थरूर म्हणाले, ज्या देशाचा लोकशाही क्रांती म्हणून गौरव करण्यात आला होता, तेथे अराजक निर्माण झाले आहे. अल्पसंख्यक आणि हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवून हिंसाचार सुरू आहे. हे पाहावे लागणे अत्यंत दुःखद आहे. एएनआय सोबत बोलताना थरूर म्हणाले, "हे अत्यंत दुःखद आहे की, अल्पसंख्यक आणि हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवून हिंसाचार केला जात आहे. आपल्याला भारतात या लोकांसोबत उभे राहायला हवे."

'बांगलादेशातील हिंसाचार नकारात्मक संकेत' -थरूर म्हणाले, "भारतीय जवानांसमोर पाकिस्तानी सेन्याने केलेल्या आत्मसमर्पणासंदर्भातील प्रतिमा तोडण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक केंद्र नष्ट करण्यात आले आहे, इस्कॉन मंदिरासह अनेक संस्थांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी भारतीय जनतेसाठी अत्यंत नकारात्मक संकेत आहे. अशा प्रकारे समोर येणे बांगलादेशाच्याही हिताचे नाही." एवढेच नाही तर, "तेथे पुन्हा एकदा लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे, यात शंकाच नाही, मात्र, आपण विशेषत: अल्पसंख्यकांच्या विरोधात जात आहात, जे योग्य नाही," असेही थरूर यांनी म्हटेल आहे.

हिंदू समाज आणि बांगलादेशचे सैन्य यांच्यात चकमक -गेल्या 5 ऑगस्टला वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात आल्या. यानंतर, बांगलादेश राजकीय अस्थिरतेतून जात आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट 2024) अल्पसंख्यक हिंदू समाजाचे नागरिक आणि बांगलादेशी सैनिक यांच्यात चकमक उडाली. हे हिंदू लोक देशातील हिंसाचारात बेपत्ता झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोस्टर्ससह निषेध करत होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राहत असलेल्या ढाका येथील जमुना स्टेट गेस्ट हाऊसबाहेर हे सर्व हिंदू निदर्शन करत होते.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBangladeshबांगलादेशHinduहिंदू