शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 23:58 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्मस्ट्राँग पेरंबूरजवळ सेम्बियममध्ये गर्दीच्या ठिकाणी आपल्या घराजवळ मित्र आणि समर्थकांसोबत बोलत असतानाच, गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास तीन बाइकवरून गुन्हेगार आले आणि त्यांनी आर्मस्ट्राँग यांची हत्या केली.

बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची चेन्नईमध्ये त्यांच्या घराजवळच 6 जणांनी हत्याकेल्याची घटना घडली आहे. आरोपी पेरंबूर भागातील सदायप्पन स्ट्रीटवर त्यांना चाकू मारून फरार झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुचाकीवरून आले होते हल्लेखोर -माध्यमांतील वृत्तांनुसार,  आर्मस्ट्राँग पेरंबूरजवळ सेम्बियममध्ये गर्दीच्या ठिकाणी आपल्या घराजवळ मित्र आणि समर्थकांसोबत बोलत असतानाच, गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास तीन बाइकवरून गुन्हेगार आले आणि त्यांनी आर्मस्ट्राँग यांची हत्या केली.

चाकूच्या सहाय्याने हल्ला -माध्यमांतील वृत्तांनुसार, हल्ल्यानंतर जवळचे लोक आर्मस्ट्राँग यांना वाचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंतच, गुनहेगार तेथून पळून गेले होते. आर्मस्ट्राँग यांचा आवाज ऐकल्यनंतर, त्यांच्या घरातील लोकही धावून आले. यावेळी आर्मस्ट्राँग यांच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या.

आर्मस्ट्राँग यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने थाउजन्ड लाइट्समध्ये ग्रीम्स रोडवरील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, डीसीपी आय ईश्वरन आणि एसीपी प्रवीण कुमार घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, घटनेच्या तपासासाठी सेंबियमचे पोलीस निरीक्षक चिरंजीवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDeathमृत्यूPoliticsराजकारणPoliceपोलिस