जोड बातमी..महिला टॅक्सी सेवेबाबत पर्यटन मंडळाची चौकशीची मागणी

By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:41+5:302015-05-05T01:21:41+5:30

कर्मचार्‍यांच्या सतावणुकीबाबत गोवा पर्यटन महामंडळाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती, असे फर्नांडिस या महिलाचालकाने सांगितले.

Attachment news .. Demand for Tourism Board inquiries for the month's taxi service | जोड बातमी..महिला टॅक्सी सेवेबाबत पर्यटन मंडळाची चौकशीची मागणी

जोड बातमी..महिला टॅक्सी सेवेबाबत पर्यटन मंडळाची चौकशीची मागणी

्मचार्‍यांच्या सतावणुकीबाबत गोवा पर्यटन महामंडळाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती, असे फर्नांडिस या महिलाचालकाने सांगितले.
ग्रीन अर्थ ही कंत्राटदार कंपनी असून गोवा पर्यटन विकास महामंडळाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सागंण्यात येते. मात्र, ऑक्टोबरमध्ये टॅक्सी सेवेच्या शुभारंभासाठी महामंडळाने २.८ लाख रुपये खर्च का केले, असा प्रश्न टॅक्सी घोटाळा प्रकरणी आवाज उठविणार्‍या ॲड. अविनाश तावारिस यांनी केला आहे.
जीटीडीसीने जाहिरातीवर ५0 हजार रुपये खर्च केले होते. महिला चालकांना देण्यात आलेली ओळखपत्रे २00६ पासूनची आहेत. या ओळखपत्रांवर गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांची स्वाक्षरी आहे. ग्रीन अर्थतर्फे चालविण्यात येणार्‍या या सेवेत घोटाळा असून या सेवेची संपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे. सेवेच्या उद्घाटनावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनीही ही सेवा जीटीडीसीअंतर्गत असून ग्रीन अर्थ संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. सतावणुकीबाबत आवाज उठविल्यानंतर पर्यटन खाते हात झटकत आहे. येत्या काही दिवसांत या टॅक्सींवर काम करण्यासाठी कर्नाटक व नेपाळ येथून महिला चालक आणण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली असल्याचे तावारिस यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Attachment news .. Demand for Tourism Board inquiries for the month's taxi service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.