बनावट दाखला बातमी जोड
By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:00+5:302016-03-15T00:32:00+5:30
तीन दाखले बनावट असल्याचे उघड

बनावट दाखला बातमी जोड
त न दाखले बनावट असल्याचे उघडपाचही संशयितांनी संगनमताने तीन बनावट दाखल तयार केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आलेले आहे. संशयितांनी आरोपी अहमद बोहरी याचा मुलगा अझिज; तनिका शैलेश शिंदे (रा.प्रेमनगर) व जगदीश मोतीराम करघे (रा.हळदा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) या तिघांचे बनावट दाखले तयार करून त्यावर महापालिकेचा शिक्का मारल्याचे उघड झाले आहे. बनावट दाखले बनवण्यासाठी संदीप तायडेला सोमनाथ वाणी हा बाहेरून काम आणून देत होता.फक्त दाखले की अजून काही...या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संदीप तायडे याच्या संगणक टेबलाच्या कपाटातून महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे ७२ होलोग्राम सापडले आहेत. याविषयी पोलिसांनी त्याला विचारणा केल्यावर तो उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे संशयित बनावट दाखल्यांव्यतिरिक्त दुसरे दस्तावेजही तयार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.